जिल्ह्यात आणखी ६२ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:41+5:302021-01-14T04:28:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ६२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. याचवेळी ...

जिल्ह्यात आणखी ६२ काेराेना पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ६२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. याचवेळी ३१६ अहवाल निगेटिव्ह आले असून, ७१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अॅंन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३७८ अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बुलडाणा शहरातील १७ , बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्ह येथील एक, चिखली शहरातील चार, चिखली तालुक्यातील अमडापूर १, सावरखेड १, सोनेवाडी १, मोताळा शहरातील दाेन, खामगाव शहरातील आठ, जळगाव जामोद शहरातील सहा, जळगाव जामोद तालुक्यातील पि. काळे १, लोणार शहरातील तीन, देऊळगाव राजा शहरातील एक, शेगाव शहरातील १४, शेगाव तालुक्यातील वरखेड १, मेहकर शहरातील एकाचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केलेल्या चिखली येथील १२, खामगाव १२, बुलडाणा अपंग विद्यालय ८, स्त्री रुग्णालय ८, शेगाव येथील ६, मोताळा ३, सिंदखेड राजा ६, जळगाव जामोद ४, देऊळगाव राजा ७, नांदुरा १, लोणार १, मेहकर येथील तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ९५ हजार १५ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ६३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच ८४० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १३ हजार ११६ कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी १२ हजार ६३९ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णालयात सध्या ३२० बाधितांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत १५७ बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.