जिल्ह्यात आणखी ५३ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:59+5:302021-01-15T04:28:59+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४७८ अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४२५ ...

जिल्ह्यात आणखी ५३ काेराेना पाॅझिटिव्ह
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४७८ अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४२५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर शहरातील ९, बुलडाणा शहरातील दहा, बुलडाणा तालुक्यातील पाडळी १, चिखली शहरातील ३३, चिखली तालुक्यातील चंदनपूर २, अंत्री खेडेकर १, मोताळा शहरातील एक, खामगाव शहरातील १४, खामगाव तालुका पाटोदा १, शेगाव शहरातील एक , सिं. राजा शहरातील दाेन, सिं. राजा तालुक्यातील गिरोली १, नसिराबाद १, दे .राजा शहरातील पाच , दे. राजा तालुका दे. मही येथील एकाचा समावेश आहे. काेराेनावर मात केल्याने जळगाव जामोद येथील दाेन, चिखली दाेन, लोणार येथील एक, सिं. राजा येथील ३, संग्रामपूर येथील ३, खामगाव येथील १९, दे. राजा १२, शेगाव १२, मलकापूर येथील एकाने काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत ९५ हजार ४४० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ६९४ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे, तसेच ८४० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ९५ हजार ४४० आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार १६९ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ६९४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.