बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४० काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:35 IST2021-01-13T12:35:46+5:302021-01-13T12:35:52+5:30
CoronaVirus News साेमवारी आणखी ३२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४० काेराेना पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी ३२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच २४७ अहवाल निगेटिव्ह आले असून ३२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २८७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २४७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ४० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०, बुलडाणा तालुक्यातील सागवन १, दहिद १, दे. राजा तालुका दे. मही १, चिखली शहरातील ८, चिखली तालुक्यातील चंदनपूर १, मोताळा तालुक्यातील राजूर १, मोहगाव १, मोताळा शहरातील १, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा २, पळसखेड चक्का १, पिंपळगाव लेंडी १, सिंदखेड राजा शहरातील एक, खामगाव शहरातील ८, जळगाव जामोद शहरातील एक, जळगाव जामोद तालुक्यातील रुधाना वकाना एक, संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ३२ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत ९४ हजार ६९९ अवाहल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १ हजार ५६८ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज अखेर एकूण १३ हजार ०५४ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १२ हजार ५६८ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.