आणखी ३९ काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:02+5:302021-02-05T08:36:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, सोमवारी, १ फेब्रुवारी राेजी ३९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह ...

Another 39 were positive | आणखी ३९ काेराेना पाॅझिटिव्ह

आणखी ३९ काेराेना पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, सोमवारी, १ फेब्रुवारी राेजी ३९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ५४५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ६५ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले व रॅपिड अँटिजेन अहवालांपैकी एकूण ५८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३, दे. राजा शहरातील ५, चिखली शहर १, चिखली तालुका दिवठाणा १, रायपूर १, वळती १, बुलडाणा तालुका नळकुंड १, निमखेडी १, शेगाव शहर ६, मोताळा तालुका तळणी २, वडगाव १, पोफळी १, लोणार तालुका पांगारा डोळे १, लोणार शहरातील १, मेहकर शहर २, मोताळा शहर १, दे. राजा तालुका सावखेड भोई, सातेफळ १, सिं. राजा तालुका साखरखेर्डा ३, मलकापूर पांग्रा १, शेगाव तालुका येऊलखेड १, गव्हाण १, जानोरी १, मूळ पत्ता खाजीखेड (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याचवेळी काेराेनावर मात केलेल्यांमध्ये बुलडाणा अपंग विद्यालयातील ४, लोणार ६, चिखली ५, सिं. राजा १, खामगांव ४, जळगाव जामोद ५, मलकापूर २, मोताळा ३, मेहकर १८, संग्रामपूर १, शेगाव ९, दे. राजा ६, नांदुरा येथील एकाचा समावेश आहे. तसेच ८४६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १४ हजार १२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार ४८३ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णालयात सध्या ३६० बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६९ बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Another 39 were positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.