जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST2021-09-09T04:42:25+5:302021-09-09T04:42:25+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ बुधवारी आणखी १२ ...

Another 12 positives in the district | जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ बुधवारी आणखी १२ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच २२ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ९७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखली तालुका तेल्हारा १, बुलडाणा शहर १, दे.राजा शहर २, दे.राजा तालुका सिनगाव जहागीर ५, नांदुरा तालुका वडोदा ३ रुग्णांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत ७ लाख १३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ११५९ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ४९९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत़ त्यापैकी ८६ हजार ७६४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ६२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Another 12 positives in the district