आणखी १० पॉझिटीव्ह, १८ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:34 IST2020-07-14T10:34:13+5:302020-07-14T10:34:25+5:30
जिल्ह्यात आणखी १० जणांचा कोरोना अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला आहे.

आणखी १० पॉझिटीव्ह, १८ जणांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात आणखी १० जणांचा कोरोना अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १८ जणांनी कोरानावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ४९२वर पोहचला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १५८ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी १४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ६ व रॅपिड टेस्टमधील ४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४९ तर रॅपिड टेस्टमधील ९९ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे १४८ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह अहवालामध्ये चिखली येथील २८ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरूष, लक्ष्मी चौक मलकापूर येथील ४७ वर्षीय पुरूष, माळीपुरा चिखली येथील २६ वर्षीय पुरूष, बाळापूर फैल खामगांव येथील २५ वर्षीय पुरूष, खामगांव येथील ५१ वर्षीय महिला व ३९ वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. लोणार येथील १८ वर्षीय तरूणी, नांदुरा येथील आठ वर्षीय मुलगा व ३० वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत २७० कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २७० आहे. आज रोजी ७२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहे.