कर्जदारांसाठी शासनाची सवलत योजना जाहीर

By Admin | Updated: August 31, 2015 01:27 IST2015-08-31T01:27:34+5:302015-08-31T01:27:34+5:30

भूविकास बँकेच्या कर्जदार सभासदांकरीता शासनाची एकरकमी परतफेड योजना.

Announcing the government's concession plan for the borrower | कर्जदारांसाठी शासनाची सवलत योजना जाहीर

कर्जदारांसाठी शासनाची सवलत योजना जाहीर

बुलडाणा : भूविकास बँकेच्या कर्जदार सभासदांकरीता शासनाने एकरकमी परतफेड योजना सुरू केली असल्याची माहिती बँकेचे अवसायक एन. बी. करे यांनी दिली. जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा भूविकास बँकेचे अवसायक एन.बी. करे यांनी यासंदर्भात बुधवारी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील पीक परिस्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या कर्जदार सभासदांना शासनाने व्याजदरामध्ये सवलत दिली असून, थेट सहा टक्के दराने थकीत कर्ज भरून खाते बंद करण्याची संधी ३१ मार्च २0१६ पर्यंंत आहे. भूविकास बँकेचा कर्जदार शेतकर्‍यांनी व्याज सवलतीचा लाभ दिलेल्या मुदतीत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Announcing the government's concession plan for the borrower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.