दारुबंदी आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा
By Admin | Updated: October 7, 2015 23:31 IST2015-10-07T23:31:14+5:302015-10-07T23:31:14+5:30
लोणार तालुक्यात बिबी येथे दारूबंदीसाठी मागील दोन वर्षांपासून महिलांचा लढास बळ.

दारुबंदी आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा
बिबी ( जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील बिबी येथे कायमस्वरूपी देशी, विदेशी दारु बंद व्हावी, यासाठी बिबी येथील महिलांच्या लढय़ास अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनाचा लढा दोन वर्षांपासून सुरू आहे. हा लढा अंतिम टप्प्यात आलेला असून, तो दडपण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे, असा महिलांनी आरोप केला आहे. तरी संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन, चर्चा करूनही दारुबंदी करण्यासाठी मतदान तारीख अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे महिलांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासचे अण्णा हजारे यांच्याकडे दारुबंदीबाबत आपल्या व्यथा मांडल्या, तसेच बिबी येथील दारुबंदीसंदर्भात आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकाराची माहिती देऊन लेखी निवेदनही अण्णा हजारेंना सादर केले. सर्व प्रकारची चर्चासुद्धा अण्णासोबत केली. यावेळी दारुबंदीसंदर्भात बिबी येथील तत्काळ मतदान तारीख घोषित न झाल्यास महिलांना पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, त्या आंदोलनाला भ्रष्टाचार निवारण समितीचे अण्णा हजारे यांचा पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासनही अण्णा हजारे यांनी दिले.