अंकिता मापारी यांचा लाेणार येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:58+5:302021-08-26T04:36:58+5:30
अध्यक्षस्थानी लोणार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शांतीलाल गुगलिया तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी श्री शिवाजी ...

अंकिता मापारी यांचा लाेणार येथे सत्कार
अध्यक्षस्थानी लोणार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शांतीलाल गुगलिया तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाशराव मापारी, प्रा. बळीराम मापारी ,गट नेते भूषण मापारी, सभापती संतोष मापारी , तहसीलदार सैफान नदाफ मान्यवर उपस्थित होते. लोणार सारख्या शहरातून उच्चशिक्षणासाठी अंकिता ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. यावेळी कार्यक्रमामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ,बँकिंग ,पत्रकार आदी सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी भव्य सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाला उपाध्यक्ष बादशहा खान ,गणेशराव मापारी, नगरसेवक आबेद खान, शेख रऊफ भाई, रमजान परसूवाले, भूषण भैया देशमुख ,प्रा सुदन कांबळे ,गजानन खरात, अजय हाडोळे, शेख समद, विजय सानप, छगन कंकाळ, प्रा. राजेंद्र बोरसे, प्रा. केला ,सतीश राठोड, आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते