अंजनखेड्याच्या उपसरपंचाची गळा कापून हत्या

By Admin | Updated: May 26, 2017 20:26 IST2017-05-26T20:03:21+5:302017-05-26T20:26:52+5:30

सोन्याच्या अंगठ्या व साखळी लंपास : हत्येमागचे कारण अस्पष्ट

Anjkheda's sub-patch cut down the throats | अंजनखेड्याच्या उपसरपंचाची गळा कापून हत्या

अंजनखेड्याच्या उपसरपंचाची गळा कापून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - तालुक्यातील अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन भागवत पायघन (वय ५५) यांची अज्ञात इसमांनी तिक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली. ही घटना हिंगोली मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपा समोरील खासगी गोडाऊन समोर २६ मे रोजी सकाळी ११ चे सुमारास घडली. 
अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे कामानिमित्त घोडबाभूळ शिवारात असलेल्या शेताकडे सकाळी फेरफटका मारायला गेले होते. शेताकडे जात असताना अज्ञात इसमांनी  तिष्ण हत्याराने गळा चिरून त्यांची हत्या केली. पायघन यांच्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, साखळी असा एकुण अंदाजे २ लाखाचा ऐवजही लंपास केला. 
या घटनेची माहिती पोलीस प्रशानाला मिळाल्यानंतर घटनास्थळावर अपर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार सुनिल अंबुलकर यांच्यासह फिंगर प्रिंट तज्ञ व अकोला येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.  या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

हत्येमागचे कारण अस्पष्ट 
पायघन यांची हत्या केल्या नंतर हत्यारांनी पायघन यांच्या बोटातील अंगठ्या, गळ्यातील साखळी व मोबाईल लंपास केला. त्यामुळे पायघन यांच्या हत्येमागे जबरी चोरी, राजकीय वैमनस्य किंवा ह्यअनैतीकह्ण संबंध यापैकी कोणतेही एक कारण असू शकते. 

चार चाकी वाहनाचा वापर 
पायघन यांची हत्या करण्याकरीता अज्ञात इसमांनी चार चाकी वाहनाचा वापर केल्याचे घटनास्थळावरील प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. या वाहनाने एका विद्युत वाहिनीच्या खांबाला धडक दिल्याने वाहनाच्या काचा फुटून घटनास्थळावर पडल्या व खांबही चांगलाच झुकला गेला. 

सोने लंपास करून दिशाभुल करण्याचा हेतू ? 
पायघन यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने लंपास करण्यामागेही हत्यारांचा पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा हेतू असू शकतो. पायघन यांच्या हत्येमागे ह्यअनैतीकह्ण संबंधाचेही कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

Web Title: Anjkheda's sub-patch cut down the throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.