अंजनी बु. येथे ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:27+5:302021-02-05T08:33:27+5:30

मेहकर: तालुक्यातील अंजनी बु. येथील स्व. दत्तात्रय सखाराम पायघन सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष ...

Anjani Bu. Flag hoisting here | अंजनी बु. येथे ध्वजारोहण

अंजनी बु. येथे ध्वजारोहण

मेहकर: तालुक्यातील अंजनी बु. येथील स्व. दत्तात्रय सखाराम पायघन सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पायघन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रमोद ढोरे, समाधान पद्मने, गजानन सरकटे, गजानन टोणपे, डॉ. वसंता नागोलकर, बाबूराव नागोलकर, पोलीस पाटील अर्जुना टोणपे, शाम पुंड, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष लाड, ग्रा. पं. सदस्य सुनील नागोलकर, सुनील पाटील, दिलीप आल्हाट, सचिन चंदनशिव उपस्थित होते. यावेळी पवन पुंड, सार्थक आल्हाट, आदिनाथ लोमटे, प्रतीक पायघन, विशाल पायघन, मधुकर जुमडे, अरुण आल्हाट, गणेश अवचार, सुनिता पायघन, मेघा ढोरे, उमा आल्हाट उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद ढोरे यांनी तर गजानन पायघन यांनी आभार मानले.

(फोटो)

Web Title: Anjani Bu. Flag hoisting here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.