शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सोयाबीनला भाव द्या, एअरगन दाखवली, संतापलेल्या शेतकऱ्याचे कृत्य; ६ हजार रुपये प्रतिक्विंटलची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:20 IST

यावेळी प्रतीकात्मकपणे कृती करत हातात कोयता आणि कमरेला एअरगन लटकवून ‘आता शस्त्र हाती घ्यावे लागणार,’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. रवी महानकर (रा.पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

खामगाव (जि. बुलढाणा) : सोयाबीनला भाव मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सोयाबीनचे पोते फाडून ते उलटून दिले. यावेळी प्रतीकात्मकपणे कृती करत हातात कोयता आणि कमरेला एअरगन लटकवून ‘आता शस्त्र हाती घ्यावे लागणार,’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. रवी महानकर (रा.पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

सध्याचा भाव फक्त ४,७०० रु. प्रतिक्विंटलमहानकर यांनी स्वत:च्या शेतीसोबत २५ ते ३० एकर शेती ठेक्याने केली. त्यातील सोयाबीन त्यांनी विकण्यासाठी आणले; परंतु, सध्या बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटलला जवळपास ४ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव आहे. किमान सहा हजार रुपये भाव मिळाला तरच उत्पादन खर्च निघेल, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त होत त्यांनी हातात कोयता व एअरगन घेऊन घोषणाबाजी करीत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची होणारी कोंडी व्यक्त केली. 

उत्पादन खर्चही निघेनाखरीप हंगामात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी भरमसाट खर्च केला. मात्र, उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र, अल्पभूधारकांनी गरजेपोटी मिळेल त्या भावात विक्री करावी लागत आहे.   

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस