अंगणवाडी सेविका मानधनाविना
By Admin | Updated: April 10, 2015 02:30 IST2015-04-10T02:30:07+5:302015-04-10T02:30:07+5:30
आठ महिन्यांपासून मानधन नाही; शासन म्हणते - वाढीव मिळणार नाही.

अंगणवाडी सेविका मानधनाविना
सिद्धार्थ आराख/ बुलडाणा: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मागील आठ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यामुळे राज्यातील २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा दाद मिळत नसल्याने अखेर या महिलांनी बुधवारपासून असहकार आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान वरिष्ठांना अंडणवाड्यांमधून विविध अहवाल मिळणार नाहीत. राज्यात २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रामीण व शहरी भागातील बालकांना संस्कारांचे धडे देतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. बुलडाणा जिल्ह्यात पाच हजार सेविका आणि २ हजार ५00 मदतनीस आहेत. या सर्व कर्मचार्यांचे मानधन सप्टेंबर २0१४ पासून शासनाने दिले नाही. त्यामुळे या महिलांवर उ पासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संघटनेच्या माध्यमातून बुलडाण्यापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत अनेक आंदोलने केलीत. तथापि, सरकारने दाद दिली नाही. अखेर सेविकांनी जिल्हाभरात असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनाबाबत दिवभरात प्रशासनाकडून दखल घेतली नव्हती.