शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

प्रत्येक कामात मदतनीस; पदभरतीत मात्र त्यांनाच खोे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 12:06 PM

Buldhana News : अंगणवाड्यांमधील मनुष्यबळ जिल्ह्यात ५ टक्क्यांनी कमी आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामीण भागातील माता व बालसंगोपणासह पोषण आहार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामपातळीवर महत्त्वाचा दुवा असलेल्या अंगणवाड्यांमधील मनुष्यबळ जिल्ह्यात ५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे राज्य तथा केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणी स्तरावरच मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या योजनांचा डोलारा सांभाळणे अवघड होत आहे. प्रत्येक शासकीय कामात मदतनीस हवी, असे असतानाही पदभरतीत मात्र त्यांनाच खो मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शासनाची कुठलीही योजना असली की, त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मदत घेतल्या जाते. मात्र, त्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी दुर्लक्ष केल्या जात असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. २५ जून रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त जागा भरण्याबाबत एकात्मिक बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे. मात्र, यामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचीच पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये अंगणवाडी मदतनीसच्या सर्वाधिक जागा रिक्त असतनाही, या पदभरतीमध्ये मदतनीसच्याच जागा भरण्यात येणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अंगणवाडी मदतनिसांवर कामाचा बोजा कायमच राहणार आहे. ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये दोन जागा आहेत, त्याठिकाणी एकाच मदतनिसावर कामाचा भार पडत असल्याने मदतनीस पदभरती होणे अपेक्षीत आहे. 

सेविका, मदतनिसांची धावपळशासनाची कुठलीही योजना ग्रामीण भागात राबवयाची असेल, तर अंगणवाडी केंद्रावर त्याची जबाबदारी सोपविली जाते. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच राहत आहे. अंगणवाडीचे काम करून, लसीकरण, पोषण आहार वाटप, गावातील सर्वे यासारख्या अनेक कामांसाठी सेविका, मदतनिसांची धावपळ कायमच आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत आदेश आलेले आहेत. परंतू यामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचीच पदे भरण्यात येणार आहेत. मदतनिसांची पदे भरण्याबाबत मंजूरी नाही.- अरविंद रामरामे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, एकात्मिक बालविकास विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र