शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:07 AM2021-08-29T11:07:12+5:302021-08-29T11:07:23+5:30

Farmer dies of electric shock : शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी ते गेले असता ही दुर्घटना घडली.

Andhera farmer dies of electric shock | शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा: येथील एका ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने २८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी ते गेले असता ही दुर्घटना घडली.
प्रभाकर कडुबा तेजनकर (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अंढेरा शिवारातील गट नं. ४१३ मधील स्वत:च्या शेतात बऱ्याच दिवसापासून ते राहत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे विहीला मुबलक पाणी आलेले आहे. 
सोबतच शेतात दलदल झाल्याने हातात येऊ घातलेले पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी विहीरीतील पाणी उपसून टाकण्यासाठी विहीरीवरील मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला व त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. 
 पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघ हे करीत आहेत.

Web Title: Andhera farmer dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.