साेयाबीनची सुडी जाळली, शेतकऱ्याचे लाखाेंचे नुकसान; मासरुळ येथील घटना
By संदीप वानखेडे | Updated: October 21, 2023 16:09 IST2023-10-21T16:09:21+5:302023-10-21T16:09:32+5:30
३० ते ३५ क्विंटल साेयाबीन जळाले

साेयाबीनची सुडी जाळली, शेतकऱ्याचे लाखाेंचे नुकसान; मासरुळ येथील घटना
मासरुळ (बुलढाणा) : साेंगणी करून लावलेल्या साेयाबीनच्या जुडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना २० ऑक्टाेबरच्या रात्री घडली़ यामध्ये जवळपास ३० ते ३५ क्विंटल साेयाबीन जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे़ सुडी पेटवणाऱ्यावर कठाेर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मासरुळ येथील शंकर माळाेदे यांनी १९ ऑक्टाेबर राेजी शेतातील साेयाबीनची साेंगणी केली हाेती़ तसेच साेंगलेल्या साेयाबीनची शेतातच सुडी लावली हाेती़ या सुडीला अज्ञात व्यक्तीने २० ऑक्टाेबर राेजी मध्यरात्री आग लावली़ या आगीत संपूर्ण साेयाबीन जळून खाक झाले़ शंकर त्र्यंबक माळोदे व कलाबाई त्र्यंबक माळोदे यांचे सामायिक क्षेत्र १.४४ हे.आर मध्ये पूर्ण सोयाबीन पेरलेले होते. साेयाबीन जळाल्याने त्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले़ माळाेदे यांनी याप्रकरणी पाेलिसात तक्रार दिली आहे़ तसेच तलाठी शहागडकर यांच्या समक्ष पंचनामाही करण्यात आला. याप्रसंगी सरपंच पुत्र मधुकर महाले, रवींद्र तोटे,शंकर माळोदे,प्रकाश लांडे, किरण देशमुख अर्जुन लांडे,कोतवाल पांडुरंग पवार उपस्थित होते.