खामगाव : येथील नगर पालिकेच्या सार्वजनिक विसर्जन विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे काँग्रेस भवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विसर्जन विहिर आहे. या विहिरीत रविवारी एक मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलीसांना माहिती िदली. पोलीसांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर विहिरीतून काढण्यात आलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रूग्णालयात नेण्यात आला.या मृतदेहाची ओळख पोलीसांकडून पटविण्यात येत आहे. या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अधिकृत समजू शकले नाही. पुढील तपास खामागव शहर पोलीस करीत आहेत.
खामगाव नगर पालिकेच्या सार्वजनिक विसर्जन विहिरीत अनोळखी मृतदेह आढळला
By अनिल गवई | Updated: October 1, 2023 17:09 IST