बुलढाण्यात वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 9, 2023 15:46 IST2023-05-09T15:46:30+5:302023-05-09T15:46:57+5:30
कृष्णा मांगले यांचे वडील हे शहरातील बालाजी संस्थान येथे नोकरीला आहेत.

बुलढाण्यात वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
देऊळगाव राजा : शहरातील मानसिंग पुरा भागातील एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांना आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कृष्णा गोपाळ मांगले (रा. मानसिंगपूरा) यांनी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. कृष्णा मांगले यांचे वडील हे शहरातील बालाजी संस्थान येथे नोकरीला आहेत. दरम्यान, ते कामावर गेले असता दुसऱ्या रूममध्ये त्यांच्या आई व्दारकाबाई गोपाळ मांगले (वय ६०) झोपलेल्या होत्या. दरम्यान, व्दारकाबाई मांगले यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कृष्णा मांगले यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नातेवाईकांच्या सहाय्याने द्वारकाबाईंना खाली उतरवले आणि तातडीने दवाखान्यात नेले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस करीत आहेत.