अमरावती बस धावणार नांदुरा मार्गे

By Admin | Updated: July 31, 2015 23:38 IST2015-07-31T23:38:41+5:302015-07-31T23:38:41+5:30

बोथा मार्ग बंद; एसटीच्या वेळापत्रकात बदल.

Amravati bus will run via Nandura route | अमरावती बस धावणार नांदुरा मार्गे

अमरावती बस धावणार नांदुरा मार्गे

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणारा बुलडाणा - बोथा- खामगाव मार्ग रात्री १0 ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावरून रात्री धावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बससेचे वेळापत्रकामध्ये एसटीला बदल करावा लागला. यामध्ये रात्री धावणारी बुलडाणा नागपूर या बसच्या वेळेत बदल करण्यात आला. तर रात्री उशीरा येणार्‍या अमरावती बुलडणा या बसचा मार्ग बदलविण्यात आला आहे. ही बस आता खामगाव-नांदुरा - मोताळा मार्गे धावणार आहे. हा बदल २ ऑगस्ट पासून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी २६ जूलै रोजी एक आदेश काढून ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा, बोथा, खामगाव हा मार्ग रात्री १0 ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्याचा आदेश काढला होता. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून बोथा खामगाव मार्ग रात्रीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गावरून रात्री जाणार्‍या बसेसच्या वेळापत्रकात ओण मार्गात बदल करण्यात आला आहे. एसटीने एक पत्रक काढून हा बदल २ ऑगस्ट पासून करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रात्री ९.३0 वाजता बुलडाणा बसस्थानकाहून सुटणारी बुलडाणा - नागपूर ही रातराणी बसच्या वेळेत बदल करून ही बस रात्री ९ वाजता सुटणार आहे. तर रात्री अमरावतीहून सुटणारी शेवटची अमरावती बुलडाणा ही बस रात्री १0 वाजता खामगावत येते. त्यामुळे या बसचा मार्ग बदलविण्यात येवून ही बस खामगाव- नांदुरा-मोताळा मार्गे सोडण्यात येणार आहे. प्रवाशांना २२ रुपयांचा भुर्दंड अमरावती - बुलडाणा ही रात्री शेवटची येणारी बस नांदुरा -मोताळा मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांना तिकीटाचे २२ रूपये अधिकचे मोजावे लागणार आहे. कारण खामगाव बुलडाणा हे अंतर ४0 कि.मी. असून त्याचे भाडे ५७ रूपये पडते. हीच बस नांदुरा मार्गे आल्यास २0 कि.मी. फेरा वाढून तिकीट ७९ रुपये होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जाणार आहे.

Web Title: Amravati bus will run via Nandura route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.