अमडापूर बसस्थानक बनले तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST2021-05-24T04:33:40+5:302021-05-24T04:33:40+5:30
चिखली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या अमडापूर येथील बस स्थानकाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले हाेते. मात्र, बांधकाम ...

अमडापूर बसस्थानक बनले तळीरामांचा अड्डा
चिखली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या अमडापूर येथील बस स्थानकाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले हाेते. मात्र, बांधकाम बंद असल्याने हे बस स्थानक अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. अर्धवट बस स्थानकाचा वापर काही मद्यपी दारू पिण्यासाठी करीत असल्याचे चित्र आहे़ या बसस्थानकामध्ये व परिसरात देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या रिकाम्या पडलेल्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या ठिकाणी रात्री अंधार राहताे. त्याचा तळीराम पुरेपूर उपयाेग घेत आहेत. याबाबत या ठिकाणी वाॅचमन असलेल्या विठ्ठल तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी बऱ्याच वेळा मद्य प्राशन करणाऱ्यांना हटकले. मात्र, तरीही अनेक जण अर्धवट बसस्थानकात मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र आहे़