शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

बुलडाणा जिल्ह्यातील अंभोडा नदीमध्ये ‘सुजलाम सुफलाम’ अंतर्गत काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:27 IST

बुलडाणा : जिल्हा  प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारला उत्साहात करण्यात आला.

ठळक मुद्दे सुमारे ४.५० किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण. जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर कामाला मंगळवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. कामावर बीजेएसच्या वतीने आलेल्या मशीन आॅपरेटर व हेल्पर्स यांच्या राहण्या व खाण्याची व्यवस्था गावकºयांच्या वतीने करण्यात येणार आहे.

बुलडाणा : जिल्हा  प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारला उत्साहात करण्यात आला. सहकार क्षेत्रात जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या बुलडाणा अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को आॅप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते मशीन्सचे पूजन करण्यात आले.बुलडाणा तालुक्यातील या सुमारे ४.५० किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात यावे, यासाठी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सातत्याने जिल्हा प्रशासन व बीजेएसकडे मागणी केली होती. गावकºयांच्या मागणीनुसार या कामाला जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर कामाला मंगळवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर या कामाला सुरुवात झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.  या कामावर बीजेएसच्या वतीने आलेल्या मशीन आॅपरेटर व हेल्पर्स यांच्या राहण्या व खाण्याची व्यवस्था गावकºयांच्या वतीने करण्यात येणार आहे. बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, अ‍ॅड. जितेंद्र कोठारी, नितीन सावजी, पंजाबराव, मिलिंद व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी