आंबेडकर जयंतीचे बॅनर फाडले, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 02:10 IST2016-04-15T02:10:05+5:302016-04-15T02:10:05+5:30
संग्रामपूर तालुक्यातील घटना.

आंबेडकर जयंतीचे बॅनर फाडले, गुन्हा दाखल
संग्रामपूर (बुलडाणा): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती उत्सवानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या शुभेच्छा फलकाची अज्ञात आरोपीने नासधुस केल्याची घटना वानखेड येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. वानखेड येथील मोहन साहेबराव इंगळे यांनी तामगाव पोलिसांकडे १४ एप्रिल रोजी यासंदर्भात तक्रार दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त वानखेड येथील ग्रामपंचायतीजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेला शुभेच्छा फलक अज्ञात इसमाने फेकून त्यावरील डॉ.बाबासाहेब यांची प्रतिमा फाडली, असे या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.