शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघ, तर सहा बिबट्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 15:16 IST

संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे.यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी येथे केवळ 78 प्राण्यांची झाली होती. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम दिनांक 19 रोजी सकाळी 9  वाजेपर्यंत राबविण्यात आला. निसर्ग अनुभव घेण्यासाठी अभयारण्यात 25 पाणवठ्यावरील  25 मचान उभारण्यात आले होते. यादरम्यान 25 वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 25 वन्यजीव प्रेमींनी यामध्ये नोंदी केल्या. 25 पैकी 17 वन्यजीव प्रेमी अभयारण्यात हजर झाले. यामध्ये नागपूर औरंगाबाद पुणे तसेच गुजरात राज्यातील वन्यजीव प्रेमीनी सहभाग दर्शविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आलेल्या प्राणी गणनेमध्ये अंबाबरवा अभयारण्यात 78 प्राण्यांची नोंद घेण्यात आली होती. यामध्ये 18 अस्वल, ३ हरीण, 15 सांभर, 9 गवा, 11 मोर, 7 रान डुक्कर, 2 म्हसण्या उद, व 13 नील गाईंचा समावेश होता. एकाच वर्षात अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे. यावर्षी ऐकून 540 वन प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये वाघ 4, बिबट 6, अस्वल 19, तडस 1, गवा 3, सांबर 14, भेळकी 24, सायाळ 2, म्हसण्या उद 27, नील गाय 47, जंगली डुक्कर 105, माकड 133, व इतर 155 प्राण्यांची नोंद घेण्यात आली. प्राणी गणनेसाठी अंबाबारवा अभयारण्यात कुत्रीम व नैसर्गिक मिळून 25 पाणवठ्यांची संख्या होती. 17 वन्य प्रेमींनी सहभाग दर्शविला. वन कर्मचाऱ्यांची संख्याही 25 होती. अंबाबरवा अभयारण्यात निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपसना रक्षक अकोट टी बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक एस जे खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर कांबळे, वनपाल एन डी राऊत,  डी डी सोनोने,  एम आर राठोड,  बी एम डुकरे,  एस व्ही कायंदे आदी कर्मचारी प्राणी गणनेला उपस्थित होते.

 

बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव कार्यक्रम  राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बाहेर राज्यातल्या पर्यटकांनी सहभाग दर्शविला. चंद्राच्या लखलखीत प्रकाशात अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांनी दर्शन दिले. त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

- एस. आर. कांबळे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी सोनाळा

टॅग्स :khamgaonखामगावwildlifeवन्यजीवforestजंगलTigerवाघSangrampurसंग्रामपूर