अमडापूर पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा

By Admin | Updated: February 19, 2015 00:16 IST2015-02-19T00:16:40+5:302015-02-19T00:16:40+5:30

१५00 रुपये व जुगार साहित्य जप्त.

Amadapur police gambling raid | अमडापूर पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा

अमडापूर पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा

अमडापूर (जि. बुलडाणा) : अमडापूर पोलिसांनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी १८ फेब्रुवारी रोजी धडक मोहीम राबवून वरली मटका व जुगारावर छापे मारुन आठ जणांना अटक करुन गुन्हे दाखल केले आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३0 वाजेला कव्हळा येथील महादेव मंदिराजवळ दोन ठिकाणी ५२ तासपत्ते खेळत असल्याची गुप्त माहिती अमडापूर पो.स्टे.ला मिळाली. त्याआधारे ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ज्ञानदेव ठाकरे, पो.कॉ.अशोक वावगे, विजय बेंडवाल, प्रसाद जोशी, सदानंद चाफले, समाधान बंगाळे यांनी छापा मारुन तुकाराम राजाराम संपुगे, रा.शेलोडी, तुळशिराम जगन्नाथ कापसे रा.धोत्रा भनगोजी, संतोष रामसिंग डुकरे रा.खामखेड, गजानन पुंडलिक शिंदे रा.सावरखेड नजीक गजानन जगन्नाथ जाधव रा.धोत्रा भनगोजी, दत्ता नवृत्ती शिंदे, गजानन रामचंद्र खंडारे दोघे रा.कव्हळा यांना ५२ तास पत्ते खेळतांना रंगेहात पकडून त्यांचेजवळून नगदी १५00 रुपये व जुगार साहित्य जप्त करुन आरोपी विरुघ्द कलम १२ (अ) मुंबई जुगार अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. तर मंगरुळ नवघरे येथे प्रल्हाद सिताराम डोके याला वरली मटका खेळवीत असताना पकडून त्याच्या जवळून नगदी १७५ रुपये व वरली मटका साहित्य जप्त करुन अटक केली आहे. अशा छुपके वरली मटका व जुगार खेळणार्‍यांविरुध्द मोहीम सुरु केल्याने जुगार खेळणार्‍यांच्या तंबुत घबराट झाली आहे.

Web Title: Amadapur police gambling raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.