निराधार कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST2021-02-10T04:35:13+5:302021-02-10T04:35:13+5:30

मोताळा : आर्थिक कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत कुटुंब प्रमुख मृत झाल्यामुळे, निराधार झालेल्या महिलांना २० हजार रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वाटप ...

Allocation of financial assistance to destitute families | निराधार कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप

निराधार कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप

मोताळा : आर्थिक कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत कुटुंब प्रमुख मृत झाल्यामुळे, निराधार झालेल्या महिलांना २० हजार रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

राज्य सरकारच्या आर्थिक कुटुंब साहाय्य योजनेंतर्गत ४६ महिलांना अनुदानाचे वाटप तहसील कार्यालय मोताळा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगून, अधिक मदत देण्याची गरज असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. या कुटुंबांना आणखी इतर कुठल्या याेजनांचा लाभ देता येताे ते पाहावे, अशी सूचनाही त्यांनी तहसीलदारांना केली. मद्य प्राशन केल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाला दारूपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Allocation of financial assistance to destitute families