पीक कर्ज त्वरित वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:16+5:302021-06-06T04:26:16+5:30

सिंदखेडराजा : कोरोना काळात सगळेच हवालदिल झाले आहेत त्यात शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. आता पेरणीचा हंगाम असल्याने ...

Allocate crop loans immediately | पीक कर्ज त्वरित वाटप करा

पीक कर्ज त्वरित वाटप करा

सिंदखेडराजा : कोरोना काळात सगळेच हवालदिल झाले आहेत त्यात शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. आता पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना बियाणे मोफत पुरवावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी दिला आहे.

या संदर्भातील एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वाघ यांनी ही भूमिका मांडली आहे.

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधातील धोरणामुळे, तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरीवर्ग पूर्णत: कोलमडलेला आहे. सोयाबीन बियाणांचा काळा बाजार सुरू झाला आहे, ही बाब कदापिही खपवून घेणार नाही. नेमून दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्ज त्वरित दिले गेले नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

Web Title: Allocate crop loans immediately