आक्रोश आंदोलनात सर्व ओबीसींनी सहभागी व्हावे : दत्ता खरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:43+5:302021-06-24T04:23:43+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी संपुष्टात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात ...

आक्रोश आंदोलनात सर्व ओबीसींनी सहभागी व्हावे : दत्ता खरात
ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी संपुष्टात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय समता परिषदेद्वारा सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन सामूहिक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेले आहे; तसेच पदोन्नतीमधील आरक्षणही राज्य सरकारने रद्द केले आहे. या पृष्ठभूमीवर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ते वाचविण्यासाठी संपूर्ण राज्यात उठाव करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ई-मेल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशाने उद्या, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आक्रोश आंदोलनात सर्व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दत्ता खरात यांनी केले आहे.