शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नोटाबंदीमुळे सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 02:28 IST

माणिकराव ठाकरे यांची पत्रपरिषदेत भाजपवर टीका.

बुलडाणा, दि. २४- नोटाबंदीचा निर्णय हा नियोजन करून घेण्यात आला नाही. शासनाने नोटाबंदी करण्यापूर्वी नागरिकांची फरपट होणार नाही, या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते; मात्र नियोजनशून्य कारभारामुळे सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे मत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.मलकापूरमध्ये दंगल झाल्यानंतर दंगलग्रस्तांची भेट माणिकराव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथे पत्रकार परिषद घेऊन दंगलीत नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अल्का खंडारे, श्याम उमाळकर, चित्रांगण खंडारे उपस्थित होते. यावेळी माणिकराव ठाकरे म्हणाले, की मलकापूरमध्ये गत काही दिवसांपूर्वी दंगल झाली. या दंगलीत शासकीय मालमत्तेसह नागरिकांच्या वैयक्तिक मालमत्तेचीही हानी झाली. याची नुकसानभरपाई त्यांना मिळायला हवी. या दंगलीसाठी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. कारवाई करताना दोषी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या धर्माचा आहे, हे न बघता निष्पक्ष कारवाई व्हायला हवी, तसेच याप्रकरणी काही निर्दोष नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करीत निर्दोष असलेल्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली. खोट्या आश्‍वासनांमुळे भाजपला नगरपालिकेत यश लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी नागरिकांना प्रत्येकाच्या खात्यात १४ लाख रुपये येतील, असे खोटे आश्‍वासन देण्यात आले होते. मतदारांनी खात्यात पैसे येतील, या भाबड्या आशेने भाजपला मतदान केले. त्यानंतर आता नोटाबंदीनंतर पुन्हा नागरिकांना आपल्या खात्यात पैसे पडतील, अशी अपेक्षा होती. या आशेवर नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाले. भाजपच्या नेत्यांनी मतदारांना खोटी आश्‍वासने दिली. त्याचे बळी नागरिक पडले असल्याची तोफ माणिकराव ठाकरे यांनी डागली. जिल्हा परिषदेची युती स्थानिक पातळीवरजिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करणार आहात काय? याबाबत माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत समविचारी पक्षाशी युती करण्यासाठी काँग्रेस नेहमीच तयार असते. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील स्थिती पाहता निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नेते याबाबत निर्णय घेणार आहेत.