लोकमत न्यूज नेटवर्कजामोद : मद्य प्राशन करून सातत्याने त्रास देणाऱ्या मद्यपी पुत्राची जामोद येथील त्याच्या माता-पित्यांनी हत्या केल्याची घटना सहा फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. दरम्यान, तीन वर्षाच्या नातीमुळे उघडकीस आली. प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या आईवडिलांना अटक केली आहे.जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील वसंत धुडे यांचे शेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर लोणखेल शिवारात आहे. या शेतात रामसिंग मनंग कसदेकर व त्यांची पत्नी सुगाबाई कसदेकर राहतात. काही दिवसापासून त्यांचा मुलगा रामभाऊ हा आईवडीलांना दारू पिवून त्रास देत होता. ५ फेब्रुवारी रोजी रामभाऊ व त्याच्या वडीलांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. झाला. या वादातुन वडील त्याला मारहाण केली. एवढेच नाहीतर रागाच्या भरात ठिबक संचाच्या नळीने गळा आवळून रामभाऊचा खून केला. ही घटना काही तासानंतर उघडकीस आली. याप्रकरणी लोणखेल येथील अनंत धुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.नातीने केला खूनाचा उलगडाआपल्या वडीलांची हत्या आजी- आजोबांनीच ठिबकच्या नळीच्या सहाय्याने केल्याचे रामसिंग कसदेकर यांच्या नातीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तपास करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सध्या ते पोलिस कोठडीत आहे.
जामोद येथे मद्यपी पुत्राची माता-पित्यांनी केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:59 IST