शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अक्षय्य तृतीयेला रंगतो तीनपत्त्याचा डाव!

By admin | Updated: April 28, 2017 00:53 IST

मोताळा : घाटावर नागपंचमी तर घाटाखालील मोताळा तालुक्यात अक्षय तृतीयेच्या पर्वावर जुगाराच्या माध्यामातून लाखो रूपयांची उलाढाल होते.

लाखोंची उलाढाल : पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्षमोताळा : घाटावर नागपंचमी तर घाटाखालील मोताळा तालुक्यात अक्षय तृतीयेच्या पर्वावर जुगाराच्या माध्यामातून लाखो रूपयांची उलाढाल होते. जुगाराची खुमारी एवढी असते अक्षय तृतियेनंतर तीन ते चार दिवसापर्यंत जुगाऱ्यांची खुमारी जात नाही.तालुकाभरात अक्षय तृतियेनिमित्त गावागावांत तीन पत्याचा डाव खेळला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खेडोपाडी अक्षयतृतियेच्या दिवशी व नंतर तीन ते चार दिवस पत्त्याचे डाव चालतात. यामध्ये तीन पानी (रंग परेल) गेम ला सर्वाधिक पसंती असते. अक्षयतृतियेच्या रात्री अगदी लहान मोठे, गरीब श्रीमंत असे अनेक जण आपली जमा पुंजी जुगाराच्या डावावर लावतात. उन्हाळ्यात येणाऱ्या या सणाला भावनिक किनारही असते. लहान मुले व महिला झोके बांधून, गाणी गावून सण साजरा करतात तर बहुतांश पुरूष मंडळी जुगारात नशीब अजमावतात. वर्षातून एकदा खेळायचे हा बहाना करून अनेक जण आपली हौस या दिवशी पूर्ण करतात. जुगाराच्या हौसेपाई लाखो रूपयांची उधळण केली जाते. अक्षय तृतिया (आखाजी) आली की गावागावांत तरूणांपासून वयस्कर व्यक्ती पत्ते खेळतात. खेडोपाडी, शेतात, घरात पत्त्यांचे डाव रंगतात. यातून लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने मोजकेच लोक नशीबवान ठरतात तर अनेक जण कंगाल होतात. जुगाराच्या लालसेपाई अनेक जण व्याजाने पैसे काढतात, तर ग्रामीण भागातील जुगारी लोक घरातील साहित्य गहाण ठेवतात. या काळातील जुगाराची लालसा इतकी तीव्र असते की अनेक जणकिमंती वस्तू बेभावाने विकून जुगाराची हौस पूर्ण करतात. यामध्ये घड्याळी, सोन्याच्या आंगठ्या, चैन, आदींचा समावेश असतो. जुगाराची खुमारी एवढी असते की दोन ते तीन दिवस एक व्यक्ती एका जागेवरून उठत नाही. परंपरागत पद्धतीच्या नावावर गावागावांत हा जुगार अक्षय तृतियेच्या दिवसी खेळल्या जातो. शहराची शांतता धोक्यात येण्याची शक्यताशालेय विद्यार्थी व बेरोजगार तरूण पिढीला जुगाराचे व्यसन लागल्यामुळे शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. जुगार खेळतांना पैसे कमाविण्याच्या नादात शालेय विद्यार्थी व तरूणांना गुटखा, तंबाखू, सिगारेट व दारूचे व्यसन लागते. जुगार खेळणारेच विविध प्रकारच्या गुन्हेगारीत सामील असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. याकडे लक्ष पोलिस प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे अशी मागणी होत आहे.