लोणारमध्ये विमान वाहतूक व्यवस्था सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST2021-09-05T04:39:00+5:302021-09-05T04:39:00+5:30
दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, जिल्ह्यातील बंद असलेल्या संजय गांधी, वीर जगदेवरा, मुंगसाजी आणि ...

लोणारमध्ये विमान वाहतूक व्यवस्था सुरू करावी
दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, जिल्ह्यातील बंद असलेल्या संजय गांधी, वीर जगदेवरा, मुंगसाजी आणि पैनगंगा सहकारी सूतगिरण्या बंद आहेत. हे प्रकल्प सुरू करावेत किंवा भागभांडवलदारास किंवा त्यांच्या वारसास व्याजासह भागभांडवल परत मिळावे, जिल्ह्यातील एमआयडीसी प्रकल्प सुरू करावेत, माँ जिजाऊंच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, शासकीय तंत्रनिकेतनलाही मान्यता द्यावी, खारपाण पट्ट्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील किडनीग्रस्तांना अर्थसाहाय्य देण्यात यावे, गेल्या २५ वर्षांत या भागात २ हजार ५०० जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आजाराने ग्रस्त असलेल्यांना आर्थिक मदत करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली जावी, तसेच शेतकऱ्यांना थकीत पीक विम्याची रक्कम मिळावी, या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
३ सप्टेंबर रोजी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन अनुषंगिक निवेदन देत या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही सावजी यांनी सांगितले.