शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोताळा ग्रामीण रुग्णालयाची ‘एड्समुक्त गाव’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 6:36 PM

मोताळा (जि. अकोला) : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराविषयी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे

ठळक मुद्देएचआयव्ही एड्स या आजाराबाबत माहिती देणारे एक फलक तयार केले असून, ते फलक गावोगावी लावण्यात येत आहे. मोताळा तालुक्यामध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे ग्रुप तयार करून त्यावरूनही मार्गदर्शन व माहिती देण्यात येत आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला ‘एचआयव्ही’ची माहिती करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

मोताळा (जि. अकोला) : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराविषयी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोताळा तालुक्यात ‘एड्समुक्त गाव’ मोहीम राबविण्यात येत असून, गावोगावी या आजाराविषयी माहिती देणारे फलक लावून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे.मोताळा ग्रामीण रुग्णालयाने एचआयव्ही एड्स या आजाराबाबत माहिती देणारे एक फलक तयार केले असून, ते फलक गावोगावी लावण्यात येत आहे. फलक लावण्यामागचा उद्देश उपस्थित ग्रामस्थांना समजावून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराला सन २०३० पर्यंत भारतामधून कायमचे हद्दपार करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा आजार कसा पसरतो, कसा पसरत नाही, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय व औषधाचे महत्त्व, या विषयीची प्राथमिक माहिती असावी म्हणून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी मोताळा तालुक्यामध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे ग्रुप तयार करून त्यावरूनही मार्गदर्शन व माहिती देण्यात येत आहे. तालुका आयसीटीसी समुपदेशक गजानन लहासे, प्रशांत, अशोक महाले यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, एएनएम व प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामसेवकांची भेट घेऊन त्यांना सदर गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. मोताळा तालुक्यातील जास्तीत जास्त एचआयव्ही बाधित असणाऱ्या गावांमध्ये आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने एचआयव्ही एड्समुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. गावातील सर्व १८ वर्षांवरील लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एचआयव्ही बाधित निघालेल्या व्यक्तींना एआरटीची औषधी मिळवून देणे व जे एचआयव्ही बाधित नाहीत, ते नेहमीसाठी कसे निरोगी राहतील, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे, गावातील प्रत्येक व्यक्तीला ‘एचआयव्ही’ची माहिती करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.(तालुका प्रतिनिधी)३५ ठिकाणी झळकले फलक!एड्सविषयी माहिती देणारे फलक मोताळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे, बोराखेडी, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी, उपकेंद्र मोताळा, बोराखेडी, आडविहीर, कोथळी, तरोडा, पिंपळगाव नाथ, राजूर, माकोडी, तळणी, शेलापूर, तालखेड, सारोळा, मा. धामणगाव बढे, पान्हेरा, कोºहाळा बा., रोहिणखेड, कुºहा, पिं.देवी, आव्हा, लिहा, शेलगाव बाजार, पोफळी, सिंदखेड, ग्रामपंचायत शेलापूर, डिडोळा बु., तरोडा, मोताळा नगर पंचायत तसेच मोताळा बस स्टँड समोरील चौक, अशा एकूण ३५ ठिकाणी लावण्यात आले आहे. या माहिती फलकाचे अनावरण प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, नगर अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळा