मोताळा ग्रामीण रुग्णालयाची ‘एड्समुक्त गाव’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 18:37 IST2018-06-30T18:36:01+5:302018-06-30T18:37:15+5:30
मोताळा (जि. अकोला) : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराविषयी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे

मोताळा ग्रामीण रुग्णालयाची ‘एड्समुक्त गाव’ मोहीम
मोताळा (जि. अकोला) : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराविषयी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोताळा तालुक्यात ‘एड्समुक्त गाव’ मोहीम राबविण्यात येत असून, गावोगावी या आजाराविषयी माहिती देणारे फलक लावून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मोताळा ग्रामीण रुग्णालयाने एचआयव्ही एड्स या आजाराबाबत माहिती देणारे एक फलक तयार केले असून, ते फलक गावोगावी लावण्यात येत आहे. फलक लावण्यामागचा उद्देश उपस्थित ग्रामस्थांना समजावून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराला सन २०३० पर्यंत भारतामधून कायमचे हद्दपार करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा आजार कसा पसरतो, कसा पसरत नाही, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय व औषधाचे महत्त्व, या विषयीची प्राथमिक माहिती असावी म्हणून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी मोताळा तालुक्यामध्ये व्हॉट्स अॅपचे ग्रुप तयार करून त्यावरूनही मार्गदर्शन व माहिती देण्यात येत आहे. तालुका आयसीटीसी समुपदेशक गजानन लहासे, प्रशांत, अशोक महाले यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, एएनएम व प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामसेवकांची भेट घेऊन त्यांना सदर गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. मोताळा तालुक्यातील जास्तीत जास्त एचआयव्ही बाधित असणाऱ्या गावांमध्ये आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने एचआयव्ही एड्समुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. गावातील सर्व १८ वर्षांवरील लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एचआयव्ही बाधित निघालेल्या व्यक्तींना एआरटीची औषधी मिळवून देणे व जे एचआयव्ही बाधित नाहीत, ते नेहमीसाठी कसे निरोगी राहतील, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे, गावातील प्रत्येक व्यक्तीला ‘एचआयव्ही’ची माहिती करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
(तालुका प्रतिनिधी)
३५ ठिकाणी झळकले फलक!
एड्सविषयी माहिती देणारे फलक मोताळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे, बोराखेडी, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी, उपकेंद्र मोताळा, बोराखेडी, आडविहीर, कोथळी, तरोडा, पिंपळगाव नाथ, राजूर, माकोडी, तळणी, शेलापूर, तालखेड, सारोळा, मा. धामणगाव बढे, पान्हेरा, कोºहाळा बा., रोहिणखेड, कुºहा, पिं.देवी, आव्हा, लिहा, शेलगाव बाजार, पोफळी, सिंदखेड, ग्रामपंचायत शेलापूर, डिडोळा बु., तरोडा, मोताळा नगर पंचायत तसेच मोताळा बस स्टँड समोरील चौक, अशा एकूण ३५ ठिकाणी लावण्यात आले आहे. या माहिती फलकाचे अनावरण प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, नगर अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले आहे.