शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:30 IST

शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अतिपावसाने जिल्ह्यात काही ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे. खरडून गेलेल्या जमीनीच्या नुकसानाचा सर्वे करण्याच्या सुचना सर्व तहसील कार्यालयांना आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या आहेत.मृृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेला. त्यानंतर मृग व आद्राच्या जोडावर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला तुरळक ठिकाणी झालेल्या पावासने शेतकरी सुखावले. परंतू २५ ते २९ जूनच्या दरम्यान, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातून उगम असलेल्या पैनगंगा नदीला चार वेळा पूरही आला. तर इतरही छोट्या-मोठ्या नद्यांना पूर येऊन गेला. अतिपावसामुळे नदी पात्राच्या काठावरील अनेक ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेती सज्ज केली होती. पेरणीसाठी गुळगुळीत केलेल्या शेतातील मातीच या पावसाने वाहून गेली. कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोडा, झरी, दहिद बु., दहिद खु., देऊळघाट, दत्तपुर, उमाळा, पळसखेड, इस्लामपूर, गोंधनखेड, गिरडा, मढ व इतर पैनगंगा नदीच्या काठावरील आणि पैनगंगेला लागून असलेल्या अनेक नाल्याना आलेल्या पुराने हजारो हेक्टरवरील सुपीक जमीन खरडुन गेली. या नैसर्गीक संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.अद्यापपर्यंत जिल्हा आपत्ती विभागाकडे नुकसानाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपत्ती विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना पत्र पाठवून पावसाने जमीनी खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या खरडलेल्या जमीनीचे सर्वेक्षण कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत महसूल मंडळकाडून सुरू झाले आहेत.

७० गावांना फटका बसल्याचा अंदाजअतिपावसामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असून, यामध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्राच्यावर जमीन बाधीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा जवळपास ७० गावांना फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत शेतजमीनी खरडून गेल्याचा सर्वे सुरू आहे. लवकरच नुकसानाचा अहवाल प्राप्त होईल. यामध्ये ७० गावांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- संतोष शिंदे,तहसीलदार, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी