शेती साहित्य लंपास, पिकाचेही केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:56+5:302021-07-09T04:22:56+5:30

अमडापूर येथील सतीश रमेश अहिर (३६) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सतीश अहिर यांच्या मालकीचे अमडापूर ...

Agricultural materials lamps, damage to crops | शेती साहित्य लंपास, पिकाचेही केले नुकसान

शेती साहित्य लंपास, पिकाचेही केले नुकसान

अमडापूर येथील सतीश रमेश अहिर (३६) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सतीश अहिर यांच्या मालकीचे अमडापूर शिवारात १६ एकर शेत आहे. या शेतामध्ये त्यांचा मोटार पंप किंमत १० हजार रुपये, १३ पाईप किमत सहा हजार रुपये, फवारणी यंत्र किंमत २ हजार ५०० रुपये, असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा माल विष्णू मारोती राऊत, विशाल विष्णू राऊत, स्वप्निल विष्णू राऊत (सर्व रा. अमडापूर) यांनी चोरून नेला आहे. शेतातील स्पिंक्लर पाईप किंमत १० हजार रुपये व २० गुंठ्यातील कारल्याचे वेल तोडून एकूण ६० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी तीनही आरोपींविरूद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Agricultural materials lamps, damage to crops