शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शेती साहित्य जळून खाक; सात लाखांचे नुकसान

By admin | Updated: April 25, 2017 00:30 IST

लोणार- शहरातील भीमराव नामदेव मापारी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवलेल्या शेती साहित्याला २३ एप्रिलच्या रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान आग लागून नुकसान झाले.

लोणार : शहरातील भीमराव नामदेव मापारी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवलेल्या शेती साहित्याला २३ एप्रिलच्या रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान आग लागून ७ लाख ६५ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड यांनी सांगितले.लोणार शहरात भीमराव नामदेव मापारी यांची सर्व्हे नं.३४२/२ मध्ये शेती आहे. शेतकरी भीमराव मापारी २३ एप्रिल रोजी रोजच्याप्रमाणे सायकांळी शेतातील कामे आटोपून घराकडे गेले होते. त्यारात्री शेताकडे जाणाऱ्या काही शेतकऱ्यांना भीमराव मापारी यांच्या शेतात आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर प्रकार लगेच दूरध्वनीवरून मापारी यांना कळविला. मात्र, शेतात जाईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आजूबाजूला पाणी उपलब्ध नसल्याने आणि विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे आग विझविता आली नाही. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन भेट दिली. सदर घटनेबाबत त्यांनी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, तलाठी अशोक सौदर व लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊसाहेब सातपुते यांना कळविले. पोलीस अधिकारी यांनी रात्रीच्या वेळी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. २४ एप्रिल रोजी सकाळीच तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड यांनी कृषि सहायक दतात्रय गर्गे यांना शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यासाठी घटनास्थळी पाठविले. यावेळी काँग्रेसचे कांता पाटील, तलाठी अशोक सौदर, भीमराव मापारी, नागेश मापारी, रवींद्र मापारी उपस्थित होते. पंचनामा केला असता आग लागून ७ लाख ६५ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड यांनी सांगितले.