शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:10 IST

कामगंध सापळे लावण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बुलडाणा :  कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येते. मात्र या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तालयांकडे पाठविण्यास टाळाटाळ होत असल्याने २४ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेला सुरूवात झाली असून कपाशी शेतात व जिनिंगमध्ये कामगंध सापळे लावण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील कापूस पिकाची पेरणी सर्वसाधारणपणे ५ जून २०१८ पासुन सुरू झालेली आहे. या कापूस पिकाचा पेरा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाच्या आगमनाच्या अनुषंगाने झालेला आहे. कापूस पिकाची सद्यस्थिती चार पानांच्या वाढीव अवस्थेपासून फुलकळी सुटण्यापर्यंत आहे. साधारणपणे ४० दिवसानंतर फुलकळीस (पातीस) सुरूवात होते. याच काळात शेंदरी बोंडअळीचे पतंग फुलकळीच्या देठावर अंडी घालतात. शेंदरी बोंडअळीचे पतंगांना कापूस पिकावरील बोंडाचे देठ हे एकमेव अंडी घालण्याचे ठिकाण असून अन्यत्र अंडी घातली जात नाही. या परिस्थितीत कापूस पिकावर आलेल्या फुलकळीच्या देठावर अंडी घालण्यास प्रतिबंध केल्यास शेंदरी बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तीन वेळा या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तांयाकडे मागूनही दिल्या गेला नाही. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेवून बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांनी प्रति एकर दोन कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स, ल्युअर्स) याप्रमाणे लावावी, जिनिंग व ऑईल मिल परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी एकरी दोन ऐवजी पाच फेरोमन सापळे लावावी, कापसाच्या जिनिंग व सरकीच्या ऑईल मिल यांनी ३० बाय ३० मीटरवर एक याप्रमाणे शेंदरी बोंडअळीचे फेरोमन ल्युअर्स सात ते आठ फुट उंचीवर लावण्यात यावेत. जिनिंग व ऑईल मिल मालकांनी सरकीच्या असलेला साठा ताडपत्रीने झाकून क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस यांची फवारणी करावी. ऑईल मिल परिसर सरकीमुक्त ठेवण्यात यावा. पावसामुळे ऑईल मिल परिसरात सरकी पडल्यामुळे कापसाचे रोपे उगवून आली असल्यास ती नष्ट करावी. कोणत्याही प्रकारचे सरकी व कापसाचे अवशेष बाहेर न टाकता नष्ट करावीत अशा सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिल्या आहेत. 

असे करा उपाय

फेरोमन सापळ्यामध्ये प्रति दिवशी सात ते आठ पतंग सापडल्यास क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लीटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के २० ग्रॅम १० लिटर पाण्यात किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के २५ मिली प्रति १० लीटर फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. प्रतिबंध उपाय म्हणून ३५ ते ४० दिवसाचे पीक झाल्यावर पाती अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. तसेच निंबोळी अर्काची दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १० ते १२ दिवसांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा