बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:33 IST2018-03-31T00:32:58+5:302018-03-31T00:33:41+5:30

बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्या शेतक-यांनासुद्धा अनुदान दिल्या जाईल, अशी घोषणा करणारे राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांच्या ८८ कोटी रुपयांच्या प्रलंबित अनुदानाबाबत घुमजाव केले आहे. 

Agitation for the micro irrigation subsidy in Buldhana district! | बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

ठळक मुद्देहर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फेरविचाराची मागणीतीन वर्षांपासून सुरू आहे पाठपुरावा

बुलडाणा न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्या शेतक-यांनासुद्धा अनुदान दिल्या जाईल, अशी घोषणा करणारे राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांच्या ८८ कोटी रुपयांच्या प्रलंबित अनुदानाबाबत घुमजाव केले आहे. 
दरम्यान, कृषी विभागाने संबंधित शेतक-यांचे अर्ज सरसकट मान्य करून थकीत अनुदान देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी कृषी मंत्र्यांकडे पुन्हा केली आहे. विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतलेला होता. तथापि पूर्व संमती न घेतल्याचे कारण समोर करीत या शेतकºयांना अनुदान नाकारण्यात आले होते. २०१५ पासून सपकाळ पाठपुरावा करीत आहेत.

अनुदानाच्या प्रश्नास बगल देण्याचा प्रयत्न!
कपात सुचनेच्या उत्तरात ९ मार्च २०१८ रोजीच्या पत्राद्वारे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत पूर्व संमतीने सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणाºया ३२ हजार ६७५ शेतकºयांना  ९४ कोटी ९५ लाख अनुदान वितरीत करण्यात आले असल्याचे सांगितले आहे; मात्र पूर्वसंमती न घेतल्याचे कारण समोर करून आपल्या स्वत:च्या घोषणेचा सोईस्कर विसर पाडत अनुदान नाकारलेल्या २८ हजार १७६ शेतकºयांच्या ८८ कोटींच्या प्रलंबित अनुदानाच्या प्रश्नास बगल देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांप्रती असलेल्या उदासीन धोरणाचे हे एक उदाहरण नव्याने समोर आले असल्याचे आ. सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Agitation for the micro irrigation subsidy in Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.