पुन्हा दोन बालकांना डेंग्यू
By Admin | Updated: November 24, 2014 00:36 IST2014-11-24T00:36:30+5:302014-11-24T00:36:30+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील १0 बालकांचा अज्ञात तापाने मृत्यू : डेंग्ग्यू सदृश्य तापाचे थैमान.
_ns.jpg)
पुन्हा दोन बालकांना डेंग्यू
सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यात गत तीन ते चार महिन्या पासून अज्ञात तापाने १0 बालकांचा मृत्यू झाला आहे. तालुकाभर डेंग्यू सदृश्य तापेचे थैमान सुरु असून, पिंपळगाव सोनारा येथे दोन बालकांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे आढळून आले आहे.
पिंपळगाव सोनारा येथे तन्वी गजानन तेजनकर (८), अनुजा प्रदिप ठोसरे (१२) या दोघींना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे आढळून आले आहे. त्यांचेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याअगोदर सुद्धा शुभम दत्तात्रय ठोसरे, सुरेश आत्माराम ठोसरे या बालकांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे आढळून आले होते. तालु क्यात सुरु असलेल्या या साथीच्या आजाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवर या तापेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील सिंदखेड राजा, किनगावराजा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, झोटींगा, गोरेगाव, उमनगाव यासह ग्रामीण भागात अज्ञात तापेचे प्रस्थ वाढले आहे. या तापेच्या अनेक रुग्ण औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत.