शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 टोमॅटो पाठोपाठ वांग्याचेही दर घसरले; भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 13:26 IST

खामगाव: जिल्ह्यात वांग्याच्या उत्पादनात झालेली वाढ व परजिल्ह्यातून होत असलेली आवक यामुळे टोमॅटो पाठोपाठ सध्या वांग्याचे दरही कमालीचे घसरले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

- देवेंद्र ठाकरे खामगाव: जिल्ह्यात वांग्याच्या उत्पादनात झालेली वाढ व परजिल्ह्यातून होत असलेली आवक यामुळे टोमॅटो पाठोपाठ सध्या वांग्याचे दरही कमालीचे घसरले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.बुलडाणा जिल्ह्यात साधारणपणे जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, चिखली व देऊळगाव राजा आदी तालुक्या भाजीपाला उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. यात वांग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. खामगाव तालुक्यातही अनेक शेतकरी वांग्याचे उत्पादन घेतात. गेल्या महिनाभरापासून वांग्याच्या दरात सतत घसरण होत आहे. दिवाळी पुर्वी बाजारात २० किलोच्या कॅरेटला २०० ते २५० रूपये असलेला दर सध्या १०० ते १२५ रूपयांवर येऊन ठेपला आहे. किरकोळ बाजारातही अनेक ठिकाणी अतिशय कमी भावाने वांग्याची विक्री होत आहे. परिणामी  शेतकºयांचा उत्पादन खर्च सुध्दा निघताना दिसत नाही. बुलडाणा जिल्ह्यात जालना, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. नवनविन तंत्रज्ञाच्या साह्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणाºया शेतकºयांची मोठी आहे. तिकडूनही बुलडाणा जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतो. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात पारंपारीक शेती करणाºया भाजीपाला उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसतो.

उत्पादनात सातत्य हवे!बुलडाणा जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन घेणाºयांची संख्या मोठी असली, तरी यात सातत्य ठेवणारे शेतकरी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. भाजीपाल्याचे दर वर्षभरात बदलत असतात. साधारणपणे हिवाळ्यात दर घसरत असल्याने यावेळी भाजीपाला उत्पादक शेतकºयांना नफा मिळत नाही. त्याचवेळी उन्हाळ्यात चांगल्यापैकी भाव मिळतो. परिणामी जे शेतकरी उत्पादनात सातत्य ठेवतात, त्यांना वर्षभरातून एक हंगाम निश्चितच नफा मिळवून देणारा ठरतो. ही परिस्थिती लक्षात घेता, भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी या क्षेत्रात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचा सल्ला जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग लागवड तज्ञ शशांक दाते यांनी दिला आहे. 

किरकोळ विक्रीतून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न!सध्या ठोक बाजारात वांग्याचे दर ६ रूपये प्रतिकिलोवर येऊन ठेपले आहेत. यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी वांग्याची ठोक बाजारात विक्री करण्यापेक्षा किरकोळ बाजारात बसणे पसंत करीत आहेत, असे जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी किसन केदार यांनी सांगितले. केदार हे सध्या जळगाव जामोद शहरासह तालुक्यात इतर बाजारांमध्येही वांग्याची किरकोळ विक्री करीत आहेत. यातून प्रतिकिलो १० रूपये एवढा भाव मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. असे असले, तरी भरपूर उत्पादन घेणाºया सर्वच शेतकºयांना हे शक्य नसल्याचेही केदार म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी