तीन वर्षांंनंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी!

By Admin | Updated: August 31, 2016 01:35 IST2016-08-31T01:20:00+5:302016-08-31T01:35:51+5:30

बुलडाणा येथील पोळा सणाचा बाजार सजला.

After three years, the joy of Pola Anand for the victims! | तीन वर्षांंनंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी!

तीन वर्षांंनंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी!

बुलडाणा, दि. ३0: शेतकर्‍यांचा आवडता सण गेल्या तीन वर्षापासून दुष्काळात साजरा होत आहे. मात्र यावर्षी चांगल्या पावसाने पिके बहरली असून, गेल्या तीन वर्षानंतर यावर्षीचा पोळा सण बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांठी आनंदाची पर्वणी देणारा आहे. चार दिवसांवर पोळा सण आला असल्याने येथील बाजारपेठ पोळा सणासाठी लागणार्‍या साहित्याने सजली आहे.
पोळासण बळीराजांसाठी आवडता सण असून येत्या चार दिवसांवर पोळासण येऊन ठेपला आहे. पोळा सणाच्या दिवशी आपल्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणार्‍या विविध वस्तूंनी येथील बाजार सजला आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती; मात्र यावर्षी चांगल्या पावसामुळे पिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे पोळा सणाच्या बाजारपेठेत तीन वर्षानंतर शेतकर्‍यांचा उत्साह दिसून येत आहे.

Web Title: After three years, the joy of Pola Anand for the victims!