‘पीआरसी’नंतर कामकाज सुस्तावले!
By Admin | Updated: January 22, 2016 01:40 IST2016-01-22T01:40:34+5:302016-01-22T01:40:34+5:30
पंचायत समित्यांमध्ये उपस्थिती कमी; कर्मचा-यांचे वर्तन नेहमीप्रमाणेच.

‘पीआरसी’नंतर कामकाज सुस्तावले!
खामगाव : पंचायतराज समिती येणार म्हणून गेल्या तीन दिवसांपासून १00 टक्के उपस्थिती व प्रचंड अलर्ट असलेले प्रशासन ह्यपीआरसीह्ण जाताच पुन्हा एकदा सुस्तावले आहे. गुरुवारी विविध पंचायत समितींमध्ये कर्मचार्यांच्या उपस्थितीबाबत ह्यलोकमतह्ण ने ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण केले असता, कर्मचार्यांची संख्या रोडावल्याचे दिसले. गेल्या दोन दिवसांपासून जनतेच्या सेवेसाठी तत्परता दाखविणार्या कर्मचार्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच निरढावलेपण आढळून आले. तीन दिवसांपासून असलेली गर्दीही बर्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.