सीईओंच्या भेटीनंतर प्रशासन लागले कामाला

By Admin | Updated: July 23, 2015 00:32 IST2015-07-23T00:32:35+5:302015-07-23T00:32:35+5:30

मग्रारोहयोच्या कामावर भर देण्याचे बुलडाणा जिल्हा परिषद सीईओंचे अधिका-यांना निर्देश.

After meeting CEOs, the administration started work | सीईओंच्या भेटीनंतर प्रशासन लागले कामाला

सीईओंच्या भेटीनंतर प्रशासन लागले कामाला

 संग्रामपूर (जि. बुलडाणा) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी २२ जुलै रोजी संग्रामपूर पंचायत समितीला भेट देऊन पंचायत समितीमधील कामकाजाचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकार्‍यांना कामकाजात सुसूत्रता आणून गती वाढविण्याबाबत निर्देश दिले.
दीपा मुधोळ यांचा येथील पंचायत समितीला नियोजित दौरा चार वेळा रद्द झाल्यानंतर २२ जुलै रोजी भेट देऊन येथील कामकाजाबाबत पाहणी करून आढावा घेतला. या भेटीच्या वेळी त्यांनी संग्रामपूर पं.स.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्वात अगोदर मग्रारोहयोच्या कामांचा आढावा घेतल्या गेला. नरेगाची कामे तसेच विहिरीच्या कामांबाबत दिरंगाई केल्यास कारवाईचे आदेश मुकाअ मुधोळ यांनी दिले. त्यानंतर तालुक्यातील नरेगाची कामे व मग्रारोहयो कामांची ग्रामसेवकांकडून आकडेवारी जाणून घेतली. ही कामे मग्रारोहयोचे जॉब कार्डधारक मजुरांकडून कुशल तसेच इतर कामे करून घेण्याची समज संबंधित अधिकारी यांना दिली.
खासदार दत्तक ग्राम करमोडाचा आढावा घेतला असता, करमोडा येथील नरेगा तसेच मग्रारोहयोची कामे अपूर्ण असल्याचे समजले. त्यावर कामांना गती देण्यास सांगितले. तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये घर कर तसेच पाणी कर वसुलीची टक्केवारी वाढविण्याची ताकीद ग्रामसेवकांना दिली. ज्या ग्रामसेवकांवर तीन ग्रामपंचायतीचा प्रभार आहे, त्यांचा प्रभार कमी करण्याचे आदेश बीडीओंना दिले. यामध्ये संग्रामपूर पं.स.मधील असा कोणताच ग्रामसेवक आढळला नाही. बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत येणार्‍या सर्व अंगणवाडींचा आढावा घेतला. संग्रामसंबंधी सर्व माहिती जाणून घेतली व ऑनलाईनवर भर देण्याचे मुधोळ यांनी सांगितले. बांधकाम व पंचायत आदी विभागातील आढावा घेत यासंबंधी सर्व अपडेट देण्यास सांगितले. ग्रामपंचायत घरकर, पर्यावरण, वृक्षलागवड, विशेष घटक योजना, दलित वस्तीची कामे इत्यादी १५ ऑगस्टपूर्वी करावी, १00 टक्के शौचालय पूर्ण करून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
या आढावा सभेला अतिरिक्त मुकाअ हजारे, उपमुकाअ (सामान्य) राजेंद्र पाटील, बीडीओ डॉ.डी.आर.हिरोळे, ता.आ.अधिकारी डॉ.सोमवंशी, गशिअ पी.पी.खिरोडकार, बाविप्र अधिकारी सर्मथ शेवाळे, पशुसंवर्धन तालुका अधिकारी डॉ.सोनोने, बांधकाम विभाग शाखा अभियंता एस. के.गोरे, विनय घिवे, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी पु.अ.पाठक तसेच पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: After meeting CEOs, the administration started work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.