शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

..तर ३१ मार्चनंतर २१ गावांचे शौचालय अनुदान बंद

By admin | Updated: February 16, 2016 00:50 IST

आमदार व मुकाअ यांच्या कार्यशाळेचे फलित; कर्तव्यात कसूर करणा-यांवर होणार कठोर कारवाई.

सुधीर चेके पाटील / चिखली(बुलडाणा): तालुक्यातील मुंगसरी या गावापाठोपाठ खोर, अंत्रीकोळी, असोला बु., बेराळा, भानखेड, भोरसी, बोरगाव वसू, डासाळा, धोत्रा भनगोजी, दिवठाणा, डोंगरगाव, कव्हळा, केळवद, किन्ही सवडत, कोलारा, मिसाळवाडी, पेठ, शेलोडी, सोनेवाडी, टाकरखेड मु. या २१ गावांनी निर्मल ग्रामकडे दमदार वाटचाल चालविली आहे. या गावांमध्ये १00 टक्के शौचालय उभारणीसाठी केवळ दीड महिन्यांचा कालावधी असून, ३१ मार्चनंतर या गावांना शौचालयांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळणार नाही. त्यामुळे त्यापूर्वीच लक्ष्यांक गाठणे गरजेचे असल्याने प्रशासकीय स्तरावरून शौचालये उभारणीचे प्रयत्न कसोशीने होत आहेत. शहरासह संपूर्ण चिखली तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने गत १ फेब्रुवारी रोजी आ. राहुल बोंद्रे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यशाळेने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळाली आहे. शौचालय बांधकामाचे यावर्षीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ३१ मार्चची ह्यडेडलाइनह्ण जाहीर झाल्याने तालुक्यातील २१ गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या वर्षाच्या हगणदरीमुक्त झालेल्या गावांच्या तालुकानिहाय यादीत चिखली तालुक्याची अवस्था अत्यंत विदारक अशीच दिसून आली आहे. तालुक्यातील केवळ मुंगसरी या एकमेव गावाने चिखली तालुक्याची नोंद घेण्यास भाग पाडल्याने कसेबसे या यादीत तालुक्याला स्थान मिळविता आले. या बाबीची गंभीर दखल आ. राहुल बोंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी घेतली आणि त्यानुषंगाने पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये तालुक्यातील विविध योजनांमध्ये शौचालये १00 टक्के पूर्ण करण्यासाठी पात्र गावातील पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी झालेल्या कार्यशाळेत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी लक्ष्यांक पूर्ण न करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाईचे संकेतही दीपा मुधोळ यांनी दिल्याने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळाली आहे.