पाच महिन्यानंतरही नाफेडकडून तुरीचे पैसे नाही
By Admin | Updated: August 10, 2014 01:24 IST2014-08-10T00:22:36+5:302014-08-10T01:24:31+5:30
पाच महिन्याचा कालावधी होवूनही तुरीचे पैसे शासनाकडून मिळाले नाहीत.

पाच महिन्यानंतरही नाफेडकडून तुरीचे पैसे नाही
संग्रामपूर : पाच महिन्याचा कालावधी होवूनही तुरीचे पैसे शासनाकडून मिळाले नाहीत. याबाबत संग्रामपूर तहसीलदार यांना ८ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे.
शासनाला विकलेल्या तुरीचे पैसे १५ दिवसात वाटप करणे आवश्यक असताना पाच महिन्याचा कालावधी होवूनही पैसे वाटप करण्यात आले नाहीत. पेरणीच्या दिवसात उधारी व उसनवारी करुन पेरणी करावी लागली. यामुळे मानसिक स्थिती खराब होत आहे. याकडे जातीने लक्ष घालून शासनाकडून पैसे वाटपाची कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना ता.प्रमुख शांताराम दाणे, पं.स. सदस्य लोकेश राठी, दीपक कुकडे, अंबादास पदमणे, रामकृष्ण ढगे, विलास घुमरे, रवींद्र राऊत, निरंजन इंगळे, संतोष तायडे, सुधीर चोपडे, चांदुरकर आदींच्या सह्या आहेत.