अखेर डोणगावमध्ये झाली धूर फवारणी
By Admin | Updated: November 6, 2014 23:15 IST2014-11-06T23:15:30+5:302014-11-06T23:15:30+5:30
प्रभाव लोकमतचा, आरोग्य विभागाला आली जाग.

अखेर डोणगावमध्ये झाली धूर फवारणी
डोणगाव (बुलडाणा) : परिसरात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले असून, नागरिकांमध्ये भी तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येकवेळा मागणी केल्यानंतर डोणगावात धूर फवारणी करण्यात आली.
डोणगाव येथे डेंग्यूसदृश तापाने एकाचा बळी; ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, या म थळ्याखाली लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच डोणगाव ग्रा.पं.चे सरपंच संजय आखाडे, ग्रामविकास अधिकारी पंजाबराव मोरे यांनी तातडीने बैठक घेऊन डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला फॉगिंग मशिनची मागणी केली. त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी फॉगिंग मशिन व १५ लिटर अल्फासायपर मेथ्रीन औषध उपलब्ध करुन दिले. डोणगाव ग्रामपंचायतच्यावतीने स्थानिक आठवडी बाजार व परिसरात फॉगिंग मशिनने धूर फवारणी करण्यात आली. त्वरित ज्याठिकाणी घाण असेल त्याठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी पोहोचून स्वच्छता अभियान राबवतील, असे सांगितले. तर डोणगावात असणार्या डेंग्यूसदृश तापापासून बचावासाठी सर्व जनतेने आठवड्यात एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहनही वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी केले.