शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शाळेवर केली ​​​ शिक्षकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:35 IST

संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली. 

- अजहर अली संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली. गेल्यावर्षी अकोली येथील प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी येथील मुख्याध्यापकास निलंबित केले. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. अकोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकूण ८० विद्यार्थी आहेत. १ ते ४ पर्यंत ही शाळा असून यावर शिक्षकांचे मान्य पदे ३ आहेत तीन पैकी दोन कार्यरत असून एक पद रिक्त आहे. दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचे प्रभार असल्याने चारही वर्गाचा भार एका शिक्षकावर येऊन पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आक्रमक झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना पंचायत समिती आवारात आणून शाळा भरवली. येथील पालकांकडून शिक्षण विभागाकडे रिक्त असलेले पद भरण्यासाठी अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करण्यात आली परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पालक आक्रमक होत विद्यार्थ्यांना पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पालकांचे अनोखे आंदोलन पाहून शिक्षण विभागही कामाला लागले कार्यालयात फिरते विशेष असलेले शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यात अनेक शाळांवर एकूण  २२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त असलेली पदे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून भरण्यात येत नसल्याने बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाचे वेळकाढू धोरण व स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्षामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप होत आहे. अकोली येथील विद्यार्थ्यांसह पालक पंचायत समिती आवारात ठाण मांडून होते. जोपर्यंत येथील रिक्त पद भरल्या जात नाही तोपर्यंत दररोज येथे शाळा भरवण्यात येणार असल्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. त्याची धडकी घेत शिक्षणविभागाने तात्ळीने या शाळेवर शिक्षक उपलब्ध दिला. फिरते विशेष शिक्षक असलेले उमेश सोनोने यांची तात्पुर्ती त्या शाळेवर नियुक्ती करण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले. 

- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हाणुन फिरते विशेष शिक्षकाची तात्पुरती अकोली येथील शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. डब्ल्यु. एच. ढगे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पं. स. कार्यालय संग्रामपुर

टॅग्स :SchoolशाळाSangrampurसंग्रामपूरTeacherशिक्षक