डीएलएड पदवीधारकास थेट एमएड सिईटीला प्रवेश!

By Admin | Updated: July 14, 2015 02:07 IST2015-07-14T02:07:42+5:302015-07-14T02:07:42+5:30

विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी प्रयत्न; रिक्त जागांवरही मिळणार थेट प्रवेश.

Admission to DLE graduate directly to M.D. | डीएलएड पदवीधारकास थेट एमएड सिईटीला प्रवेश!

डीएलएड पदवीधारकास थेट एमएड सिईटीला प्रवेश!

बुलडाणा : डिएलएड अर्थात अध्यापन पदविकेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. शासनाने या अभ्यासक्रमाचे नाव डिएड ऐवजी डिएलएड केले असले तरी, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने, आता डिएलएड पूर्ण करणारा विद्यार्थी जर पदवीधर असेल तर त्याला थेट एमएड म्हणजेच स्नात्तोकोत्तर अध्यापन पदवीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी असलेल्या सिईटी प्रवेश परिक्षेसाठी अशा उमेदवारांना पात्र ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही वर्षापूर्वी डिएड या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता; मात्र सन २0१0 नंतर शिक्षक भरती परीक्षाच झाली नाही. त्यामुळे शिक्षण अध्यापन पदविका देणारी महाविद्यालयं ओस पडली आहेत. शिकूनही नोकर्‍या नसल्याने हजारो विद्यार्थी बेरोजगार फिरत असून, विद्यालयांना नवे विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने सन २0१५ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाकडून देण्यात आलेल्या प्रवेश अर्जावरच ह्यअसे शिक्षण घेतल्यास नोकरी मिळेलच याची खात्री नाहीह्ण असे स्पष्ट नमूद केले आहे. यापृष्ठभूमिवर आता डिएलएड पूर्ण करणारा विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याला थेट एमएडला प्रवेश देण्याची सवलत सुरू करण्यात आली आहे. राज्यात एमएड प्रवेशासाठी २५ जुलै रोजी सामायिक प्रवेश परिक्षा (सीईटी) होणार आहे. या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष देताना डीएलएड पदविकाप्राप्त उमेदवार जर पदवीधर असतील, तर त्यांना थेट एमएडची सिईटी देऊन प्रवेश घेता येणार असल्याचे नमुद केले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी २ जुलै रोजीच्या परिपत्रकाद्वारे सर्व एमएड महाविद्यालयांना सूचना दिली आहे. एमएड प्रवेश नियमावलीमध्ये डिएलएड उत्तीर्ण पदविधारकास थेट एमएडची सिईटी देता येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. याबाबत २ जुलै रोजी प्रवेश अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेची कारवाई सुरू असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.सुभाष कांबळे यांनी सांगीतले.

*अशी आहे गुणांची अट

         ज्या उमेदवारांनी डिएलएडला ५0 टक्के व पदवीला ५0 टक्के गुण प्राप्त केले असेल, असेही उमेदवार यावर्षीपासून प्रथमच एमएडच्या सीईटी परीक्षेस पात्र राहणार असून ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर थेट एमएड प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. *स्पॉट अँडमिशनचाही पर्याय डिएलएड प्रवेशासाठी शासनाने पहिली दुसरी प्रवेश फेरी आटोपली असून, आता रिक्त झालेल्या जागांकरीता स्पॉट अँडमिशनचाही पर्याय दिला आहे. यासाठी २२ ते २४ जुलै यादरम्यान विद्यार्थ्यांना थेट आपल्या सोयीच्या विद्यालयाशी संपर्क करून प्रवेश घेता येणार आहे.

Web Title: Admission to DLE graduate directly to M.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.