जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी १० जणांवर अॅक्ट्रासिटी
By Admin | Updated: July 14, 2017 19:52 IST2017-07-14T19:52:55+5:302017-07-14T19:52:55+5:30
डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील १० जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी १२ जुलै रोजी अॅक्ट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी १० जणांवर अॅक्ट्रासिटी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील १० जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी १२ जुलै रोजी अॅक्ट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काटा ता.जि.वाशिम येथील भास्कर गोपीचंद करंगे हे त्यांच्या शेतात कामावर असलेले दत्ता भगवान शिंदे व दलसिंग चव्हाण यांचेसोबत १६ जून २०१७ ला त्यांच्या मालकीच्या शेतात शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना लोणीगवळी येथील प्रकाश जाणूजी जाधव व अंकीत प्रकाश जाधव व इतर ८ जणांनी फिर्यादी भास्कर गोपीचंद करंगे यांचा अवमान करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चौकशी अहवालावरुन १२ जुलै २०१७ ला वरील १० आरोपीविरुद्ध कलम १४३, ५०६ भादंवि व सहकलम ३ (१) (८) (ड) अजाज प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वैंजने करीत आहेत.