वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: May 20, 2014 23:53 IST2014-05-20T23:13:33+5:302014-05-20T23:53:57+5:30
अवैध वाहतुकीला पेव फुटले असल्यामुळे अपघाताच्या घटनाही कळस गाठत आहेत.

वाहनांवर कारवाई
डोणगाव : येथे अवैध वाहतुकीला पेव फुटले असल्यामुळे अपघाताच्या घटनाही कळस गाठत आहेत. यासंदर्भात लोकमतने १९ मे रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत वाहतूक शाखेने ३५ वाहनांवर कारवाई केली आहे. शहरात विनापरवाना अल्पवयीनांच्या गाड्या सुसाट धावत असून, दुचाकीवर तीन ते चार शिट घेऊन जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. वाहतूक शाखेच्या दुर्लक्षित धोरणामुळे परिसरात अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे १८ मे रोजी काळीपिवळीचा अपघात होऊन १९ प्रवासी जखमी झाले होते; तसेच परिसरात होत असलेल्या अवैध वाहतुकीमुळे अपघातास आमंत्रण दिल्या जात आहे. यासंदर्भात ह्यकाळी पिवळी अपघातात १९ जण जखमी व डोणगाव येथे अवैध वाहतुकीला उधानह्ण अशा प्रकारचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी डोणगाव परिसरात येवून ३५ अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कलम २१ (२0), १७७ नुसार कारवाई केली आहे. वाहतूक शाखेने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर केलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचा जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पोकॉं विलास कुंदेरकर, ए.एस.आय. देशमुख यांनी सपाटा लावल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनधारकांच्या मनात धडकी बसली आहे.